पनवेल प्रेस क्लब अध्यक्षपदी संतोष घरत ; उपाध्यक्षपदी सागर राजे याची बिनविरोध निवड
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल प्रेस क्लब या नोंदणीकृत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ता. ६ डिसेंबर रोजी कळंबोली न्यू इंग्लिश शाळेत पार पडली . यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
त्याच प्रमाणे सागर राजे यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर संघटनेच्या सचिव पदी *देविदास गायकवाड* व खजिनदार पदी *शैलेश चव्हाण* यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून *सुनील कोळी* यांची निवड एकमताने करण्यात आली .
पनवेल प्रेस क्लब ही धर्मादाय संस्था एफ ५५८१ या क्रमांकाची नोंदणीकृत संस्था आहे. सण २००६ वर्षांपासून ही संस्था पत्रकारांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे या सोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक हिताचे उपक्रम राबवित आहे . या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली तसेच अनेक सामाजिक हिताचे ठराव संमत करून पत्रकारितेला नवीन आयाम देण्याचे सभेमध्ये ठरविण्यात आले आणि त्यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्याला स्थरावर तसेच संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याची ग्वाही सभेमध्ये सभासदांनी दिली
यावेळी पनवेल प्रेसक्लब संस्थेचे मुख्य पदाधिकारी जेष्ठ पत्रकार *राजेश कदम , संतोष सावंत* यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या पुढील कार्यक्रमाबाबत विचार विनिमय व मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी सदस्य म्हणून विकास पाटील , रशीद इनामदार , दीपक घरत , मनोज भिंगार्डे , असीम शेख , प्रमोद जाधव , चंद्रकांत शिर्के , प्रसाद परब , रवींद्र चौधरी , मनोज गडगे उपस्थित होते
सर्व पत्रकार सभासदांना सोबत घेऊन आपली समाजीक बांधिलकी ओळखून तशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करून ते यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष घरत यांनी यावेळी बोलताना सांगितले.