कळंबोली परिसरातील शेकडो तरुणांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनेचे अध्यक्ष व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून कळंबोली व रोडपाली परिसरातील शेकडो तरुणांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत जिल्हाप्रमुख शिरिष घरत व विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी केले.
तालुक्यातील रोडपाली, कळंबोली परिसरातील शेकडो तरुणांनी शिवसेनेत जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, प्रकाश चांदिवडे (उपमहानगर समन्वयक ), पदमाकर पाटील (विभाग प्रमुख) आणि अक्षय साळुंखे ( शहर संघटक कळंबोली) यांच्या नेतृत्वात श्याम नामदेव कोळी, हरिचंद्र ठाकूर आकाश शेलार, अजय शेलार, विक्रम जगताप या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश केल्यावेळी त्यांचे स्वागत करताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, प्रकाश चांदिवडे (उपमहानगर समन्वयक ), पदमाकर पाटील (विभाग प्रमुख) आणि अक्षय साळुंखे ( शहर संघटक कळंबोली) आदी.