आज ऑल इंडिया सीफेअर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अभिजीत दिलीप सांगळे यांच्या उपस्थित,सिंधुदुर्ग येथील अरना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाइम स्टडीज कारेक्रम सपन्न
पनवेल (वार्ताहर )आज ऑल इंडिया सीफेअर्स अँड जनरल वर्कर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अभिजीत दिलीप सांगळे यांना सिंधुदुर्ग येथील अरना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाइम स्टडीज येथे मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले.
तेथे अभिजीत सांगळे यांनी मर्चंट नेव्हीला सक्ती करण्यास इच्छुक असणार्या सर्व सीफेरर्सना मार्गदर्शन केले आणि एक छोटेसे सादरीकरणही दिले.
ते म्हणाले की आपण मर्चन्ट नेव्ही हे करियर म्हणून का निवडावे?
बहुतांश तरूण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक क्षेत्रातील करियर निवडतात. काहीनी तर स्वत:भोवती एक ठराविक चौकटच आखून घेतलेली असते. ती चौकट ओलांडायची नाही, असा त्याचा पालकांचा आग्रह असतो. मग तो ती चौकट पार करणार तरी कसा? मात्र काही होतकरू तरूण बिंधास्त असतात. करियरची दिशा शिक्षण घेत असतानाच ठरववितात. आणि पारंपरिकेच्या पलिकडेचे जरा ‘हट के’ करियर निवडतात, आणि असेच एक जरा ‘हट के’ म्हणजे मर्चट नेव्ही होय.
भारताला साडेसात हजार कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला असून निसर्गाने भारताला भरभरून दिले आहे. त्यामुळे भारतात मर्चट नेव्हीचे महत्त्वही वाढलेले दिसते. मर्चट नेव्ही विभाग हा इंडियन नेव्ही संबंधित असल्याने आव्हानात्मक कार्य करणार्या उमेदवारांची आवश्यकता असते.
र्मचट नेव्ही म्हणजे व्यापारी नौदलाचा होय. आज सागरी मार्गाने देशांतर्गत तसेच विदेशात मालवाहतूक, तेलवाहतूक, प्रवासी वाहतूक केली जाते ती मर्चट नेव्हीच्या आख्यारीत येत असते. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे व व्यापाराच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मालाची ने-आण होत असते. आज समुद्रीमार्गाने प्रवास करणार्यांची संख्या वाढली आहे. आशिया खंडात भारताचा सागरी वाहतुकीसाठी दुसरा क्रमांक लागतो तर जगात भारताचा दहावा क्रमांक आहे. मर्चट नेव्हीमध्ये करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. कारण एका समुद्र पर्यटन जहाजावर सुमारे 1400 ते 1500 कर्मचारी काम करत असतात. सागरी सफर, जगाची भटकंती आदीमुळे होतकरू तरूण मर्चट नेव्हीकडे आकर्षित होत आहेत. चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी देखील 22-25 हजार रूपयांपर्यंत पगार कमावू शकतो.
मर्चट नेव्हीमध्ये डेक विभाग, इंजिन विभाग, सर्व्हिस विभाग हे तीन मुख्य विभाग असतात. या विभागातील विविध पदांसाठी भरती केली जात असते. आठवीपासून पदवीपर्यंतच्या उमेदवारांना मोठी संधी असते. विशेष म्हणजे आय.टी.आय. किंवा डिप्लोमा तसेच बारावी सायन्स, बी. एस्सी., बी. ई. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरूणांना प्राधान्य दिले जाते.
मर्चट नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना शाररीक व मानसिक वैद्यकीय चाचणी परीक्षा पार करावी लागत असते. भरती होण्यासाठी उमेदवाराला आपला पासपोर्ट-व्हिसा सादर करावा लागत असतो.
मर्चट नेव्हीमधील भरतीचीच्या जाहिराती वर्तमान पत्रे, जहाज कंपन्याच्या वेबसाईटस् वर दिल्या जात असतात. या क्षेत्रात करियर करण्यास इच्छूक उमेदवारांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मर्चट नेव्हीच्या डेक विभाग, इंजिन विभाग, सर्व्हिस विभागात काम करण्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक उमेदवारांची आवश्यकता असते.
पुण्यात माईर्स एमआयटीची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग अर्थात ‘मॅनेट’ ही मर्चंट नेव्हीचे शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेला नौकानयन मंत्रालयांतर्गत असलेल्या डायरेक्टर-जनरल शिपिंगची मान्यता आहे.
‘मॅनेट’मध्ये उत्कृष्ट सोयी-सुविधांसह उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. ‘शिप-इन-कॅम्पस’ ही सुविधा असणा-या जगातील मोजक्याच संस्थांपैकी मॅनेट ही एक आहे. संस्थेतर्फे बी.टेक. (मरिन इंजिनीअरिंग)ची पदवी प्रदान केली जाते.
भारतातील व्यापारी जहाजाचा कारभार हा मुंबई, न्हावाशेवा, कोचीन, कांडला, मद्रास, न्यू मँगलोर, मार्मा गोवा, पारादीप, तुतिकोरीन, विशाखापट्टणम् या बंदरांतून चालतो. शिपिंग कॉर्पोरेशनऑफ इंडिया, ग्रेट इस्टर्न शिपिंग, इंडियन स्टीमशिप कंपनी, कामोदर बल्क कॅरिअर्स, साऊथ इंडियन शिपिंग कॉर्पोरेशन, चौगुले स्टीमशिप लिमिटेड, डेंपो स्टीमशिप लिमिटेड, रतूआवन शिपिंग भरती आदी र्मचट नेव्हीमध्ये कार्यरत कंपन्या आहेत.