तीन ते चार अज्ञात इसमांनी कुत्र्याला क्रूरपणे मारले ठार
पनवेल दिनांक 16 वार्ताहर:कळंबोली वसाहतींमधील मोकळ्या मैदानात तीन ते चार अज्ञात इसमांनी एका चार ते पाच महिन्याच्या कुत्र्यास खूप क्रूरतेने मारहाण करून जीवे ठार मारल्याचा गुन्हा कळंबोली पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.
कळंबोली वसाहतीतील रोडपाली सेक्टर 16 येथील मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या एका चार ते पाच महिन्याच्या कुत्र्यास अज्ञात तीन ते चार इसमांनी क्रूर पणे मारहाण करून ठार मारले आहे. याबाबतची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करताच भादंवि कलम 429, 34 सहकलम 11 ड,प्रा.नि. वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.