मोबाईल केला लंपास पनवेल जवळील आदई तलाव परिसरात घडली घटना
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी मोबाईलवर बोलत असलेल्या एका महिलेचा मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाल्याची घटना पनवेलजवळील आदई तलाव परिसरात घडली आहे. नवीन पनवेल से.-7 येथे राहणाऱ्या सोनाली जाधव या आदई तलावाच्या दिशेने मोबाईलवर बोलत जात असताना त्यावेळी अचानकपणे पाठीमागूनमोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनीमहिलेचा मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.