पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तीन जखमी
पनवेल दि.31 (वार्ताहर): पनवेल परिसरात झालेल्यादोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर जेएनपीटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या लेनवर प्रतिक म्हात्रे (वय-25) हा त्याच्या ताब्यातील आय 20 कार क्र.-एमएच 46 एक्यू 5935 ही गाडी घेऊन भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील त्याचा ताबा सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला लोखंडी गर्डर पट्ट्यांना लागून उभ्या असणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जाऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो स्वतः गंभीररित्या जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पिनाक बरसाडीया, चैतन्य जवेरी व राहूल रावरीया हे तिघेजण होंडाई गाडीने खारघर येथून मुंबई बाजूकडे जात असताना हिनंदानी पूलावर मुंबई बाजूकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून त्यानंतर ट्रक दुभाजक ओलांडून समोरील बाजूस असलेल्या होंडाई गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चैतन्य जवेरी (वय-19) याचा दुर्दैवी गंभीरित्या जखमी होऊन मृत्यु झाला आहे. तर त्याचे दोघे सहकारी जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात उपचारार्थ दाखल कऱण्यात आले आहे. या अपघाताची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.