इन्हर्वटर मशिनसह बॅटर्यांची चोरी
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः इन्हर्वटर मशिनसह तीन एक्साईड कंपनीच्या बॅटर्यांची चोरी केल्याची घटना पनवेल जवळील मानघर येथे घडली आहेे.
विवेककुमार रमेशकुमार शर्मा यांच्या मानघर येथील ब्रिजच्या जवळ असलेल्या डिजी टेक फिल्म स्टुडिओ येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून त्या ठिकाणी असलेला 9 हजार रुपये किंमतीचा मायक्रोटेक कंपनीचा 24 व्होल्टचे इन्हर्वटर मशिन तसेच तसेच एक्साईड कंपनीच्या बॅटर्या असा मिळून जवळपास 21 हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.