पत्रकार मिलिंद खारपाटील यांची आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विदयलाय नवीन पनवेल ला पुस्तके भेट
पनवेल/वार्ताहर :- 51 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विदयलाय नवीन पनवेल ला पुस्तके भेट दिली.
वाचून झालेले पुस्तक घरात राहण्यापेक्षा ग्रंथालयाला दिले तर किमान 100 वाचक वाचू शकतील असे मिलिंद खारपाटील यांनी सांगितले. वाचाल तर वाचाल हा संदेश त्यांनी या वेळी दिला. गेल्या काही वर्षात त्यांनी सेकंडरी स्कूल चिरनेर, के गो लिमये वाचनालय पनवेल. , साने गुरुजी वाचनालय शांतीवन, तालुका वाचनालय पोलादपूर, संत गजानन महाराज वाचनालय गिरहमवणे दापोली, न्यू इंग्लिश स्कूल पनवेल, रयत शिक्षण संस्थेचे वावरले हायस्कूल इथे त्यांनी सव्वा लाखाहून आधिक किमतीची पुस्तके ग्रंथालयाला दिली आहेत.त्यांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समिता सोमण, ग्रंथपाल सौ कानिटकर आदी उपस्थित होते.