अल्पवयीन मुलीस फूस लावून नेले पळवून
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तिच्या कुटुंबियांच्या रखवालीतून फूस लावून पळवून नेल्याची घटना कोळवाडी येथे घडली आहे.
सदर मुलीची उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, केस काळे लांब, डोळे काळे, बांधा मध्यम, कानात साधे झुमके, उजव्या हातात दोन साध्या अंगठ्या असून अंगात काळ्या रंगाचा टॉप व पांढर्या रंगाची पॅन्ट, पायात लाल रंगाची चप्पल आहे. तिला हिंदी भाषा बोलते व समजते. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे 02227452444 येथे संपर्क साधावा.