कपाटाचे लॉकर मधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी
पनवेल दि.२० (वार्ताहर) : लोखंडी कपाटातील तिजोरी मध्ये ठेवलेले एक लाख तीन हजार रुपयांच्या दागिन्यांची अज्ञाताने चोरी केली आहे. चोरा विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्टर 11 तळोजा फेस वन येथील पल्लवी नितीन कांबळे यांनी दागिने त्यांचे कपाटातील तिजोरीमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्याने तिजोरी चा दरवाजा उघडून लॉकरमधून दागिन्यांची चोरी केली आहे.