पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई ; 14 सायकली जप्त
पनवेल, दि.31 (संजय कदम) : पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याकडून 14 सायकली हस्तगत केल्या आहेत.
या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि देवळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे व त्यांच्या पथकाने पनवेल परिसरात अधिक शोध घेत असताना त्यांना आरोपी दिनेश जाधव (32) याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून विविध नामांकित कंपन्यांच्या 14 सायकली ज्याची किंमत जवळपास 58 हजार रुपये इतकी आहे. हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत केलेल्या सायकली ज्या कोणाच्या असतील त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे ०२२२१४५२३३३ अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळे ९१३७१४५९६२ यांच्याशी संपर्क करावा असेच आवाहन करण्यात आले आहे.