मुंब्रा पनवेल हायवे रोडवर वृद्ध इसम जखमी
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः तळोजा गावाकडे पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने साठ वर्षीय ईसमास धडक दिली. या धडकेत बंडू पंढरी लोखंडे (तळोजा) हे जखमी झाले आहेत. अपघाताची खबर न देता वाहन चालक पळून गेला आहे. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंडू लोखंडे हे तळोजा गावाकडे पायी चालत जात होते. त्यावेळी मुंब्रा पनवेल हायवे रोड वरील हॉटेल गझेबोचे विरुद्ध बाजूस मुंब्रा बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्या लेन वर त्यांना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात बंडू हे जखमी झाले.