राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी कळंबोली मधून ऑक्सिजन रेल्वे
पनवेल, दि.18 (वार्ताहर)- राज्याची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन मागवता यावा या करिता भारतीय रेल्वे मदत करणार असून विशाखापट्टनम येथून ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेल मधील कळंबोली येथून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना करण्यासाठीची तयारी भारतीय रेल्वेने पूर्ण केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढतेय. यातच अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात गरज भासतेय. परंतु ऑक्सिजनच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासतेय. रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्याच्या मदतीला भारतीय रेल्वे धावून आली असून विशाखापट्टनम येथून ऑक्सिजन मागवन्याकरिता विशेष कॉरिडॉर ची सोय रेल्वे मार्फत करण्यात आली आहे.
……
कळंबोली येथे विशेष ट्रॅक
विशाखा पट्टनम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेले टँकर नेण्यासाठी कळंबोली रेल्वे स्थानकावर सलग 48 तास काम सुरु ठेऊन प्लॅटफॉर्म ची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी 16 टन क्षमतेचे 15 टँकर विशेष ट्रेन वर चढवण्यात येणार आहेत.