नवी मुंबई अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे शाखा व पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे खैरवाडी आदिवासी वाडी मध्ये अन्नधान्यचे वाटप
पनवेल,/वार्ताहर: नवी मुंबई अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री.डाॅ.बी.जी.शेखर पाटील गुन्हे शाखा व पोलीस सह आयुक्त श्री.विनोद चौहान साहेब गुन्हे शाखा , यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्याने आज दिनांक २3/०४/२०२१ रोजी पनवेल तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे खैरवाडी आदिवासी वाडी मध्ये राहणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या सुमारे 75 गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे ५०० व्यक्ती) पंधरा दिवस पुरेल एवढे तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, मिठ, तेल, मसाले, , बिस्किटे, चहा पावडर साखर मास्क व सेनेटाईझर अशा दैनंदिन जिवनाश्यक वस्तूंचे त्यांचे गावात/ जाऊन वाटप करण्यात आले आहे.
सदर रेशन वाटपासाठी नवी मुंबई अतिरिक्त पोलिस आयुक्त मा.श्री.डाॅ.बी.जी.शेखर पाटील साहेब गुन्हे शाखा व सहा. पोलीस आयुक्त,मा. श्री.विजय चौहान साहेब गुन्हे शाखा नवी मुंबई,व श्री.गिरीधर गोरे वरीष्ट पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-2 व श्री.विनय कादबाने वरीष्ट पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-3 व श्री.जयराज छापरिया वरीष्ट पोलीस निरीक्षक आमलिपदार्थ गुन्हे शाखा नवी मुंबई व श्री.पराग सोनवणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक. अनैतिक मानवी वाहतूक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई व श्री.निवॄती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्येवर्ति गुन्हे शाखा नवी मुंबई व श्री.सुनिल शिऺदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कक्ष-1 व सर्व पोलीस कर्मचारी गुन्हे शाखा नवी मुंबईव खैरवाडी माजी सरपंच श्री.अनंता खैर,श्री.आंकेश पांडव ग्रामपंचायत सदस्य.खैरवाडी. श्री संजय पाटील (मोर्बे) अध्यक्ष पनवेल तालुका पोलिस पाटील संघटना.श्री.रवी पाटील (कोंडले) समाजसेवक व श्री पिंटु म्हात्रे समालोचक व ग्रामस्थ उपस्थित होते