नवी मुंबई काँग्रेसच्या ओबीसी जिल्हाध्यक्षपदी संतोष सुतार
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षांतर्गत घडामोडी वाढीस लागल्या आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी काँग्र्रेस पक्षाच्या नवी मुंबई ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी ही नियुक्ती केली आहे.
संतोष सुतार हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून सध्या संतोष सुतार हे नवी मुबई जिल्हा काँग्र्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सोशल मिडियावर संतोष सुतार कमालीचे सक्रिय असून सतत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेताना ते पहावयास मिळतात. धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात संतोष सुतार यांचे योगदान असून संतोष सुतार यांची ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करताना नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचा जनाधार काँग्रेसकडे वळविण्याची काँग्रेसने खेळी केल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकारणात सुरू झाली आहे.