महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था कडून सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्क चे वाटप विरेंद्र (गुरु) म्हात्रे व नयन पवार यांचा स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था यांच्या तर्फे नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप शनिवार दि १मे २०२१ रोजी करण्यात आले.
या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री व आरविंद मिरा संस्थेच्या संस्थापक नयन पवार तसेच डॉ शितल सातपुते, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुनाथ नाईक इत्यादी मान्यवर यांच्यासह लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपाध्यक्ष अक्षय पाचारने, खजिनदार विक्की वांडे व सफाई कामगाराचे सुपरवायझर विलास तांडेल व ईतर सदस्य व कामगार उपस्थित होते