मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने रस्त्यावर पडलेले झाडं उचलून घेतले.
पनवेल प्रतिनिधी: अमरधाम ते वीर सावरकर चौक रस्त्या लगत असलेलं जुनं सुकलेलं झाडं उन्मळून रस्त्यावर पडले,त्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्या आणि विद्युत पुरवठा खंडित झाला होता.तसेच झाडं रस्त्यावर पडल्यामुळे रहदारी साठी पण अडथळा निर्माण झाला होता.
नगरसेवक विक्रांत पाटील यांनी
लगेच महावितरण आणि वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावर पडलेले झाडं उचलून घेण्यास सांगितले व विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम युद्ध पातळीवर करून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतला.नगरसेवक विक्रांत पाटील लॉक डाऊन च्या काळात सुद्धा नागरिकांच्या समस्यांचे निरसन तत्परते करतात याबद्दल नागरिकांना समाधान व्यक्त केलं.