नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवापालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणी
पनवेल दि.09 (वार्ताहर)-नवी मुंबई महापालिकेनेनोडल ऑफिसर किंवापालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ नेमण्याची मागणीभारतीय जनता पक्ष कामगार आघाडी चे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणाऱ्या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबई मधील काही छोट्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्या होत्या व अश्या तऱ्हेचे हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत आहेत व अत्यावश्यक वेळेमध्ये हे हॉस्पिटल जनतेच्या उपयोगी पडत आहेत. पालिकेने आपत्कालीन स्थितीत नव्याने परवानगी दिलेल्या काही रुग्णालयात उपचाराच्या दर्जाबाबत माहिती पालिकेकडे असावी कारण अनेक लहान रुग्णालयात मृत्यू घडत असल्याचे आढळून येत आहे. त्या करिता पालिकेने त्या ठिकाणी नोडल ऑफिसर नेमावेत किंवा त्या ठिकाणी पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ञ ची नेमणूक करण्यात यावी त्यामुळे नवी मुंबईमध्ये दिवसोदिवस नवीन रुग्ण संख्या ची घट होत आहे त्या प्रमाणे होणाऱ्या मृत्यूची कारणे देखील जनतेच्या समोर येतील अश्या तऱ्हेची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी चे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.