श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे कर्मवीर आण्णाची ६२ वी पुण्यतिथी साजरी.
उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी शिक्षणाची ज्ञान गंगा खेडोपाडी गोरगरिबांपर्यंत पोहोचवणारे त्यांना शिक्षणाची द्वारे उघडून देणारे भगिरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांची ६२ वी. पुण्यतिथी विद्यालयात साजरी करण्यात आली. कर्मवीर आण्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, नरेश घरत,यशवंत घरत,धर्मदाय घरत,विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग,गुरुकुल प्रमुख म्हात्रे जी.आर.लेखनिक सुरेश ठाकूर, राजेश कांबळे व पांडुरंग मुंबईकर इत्यादी उपस्थित होते.