अत्यंत गरजू रिक्षाचालकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे रिक्षाचालकांना आर्थिक मदत.
पनवेल / प्रतिनिधी : लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात पनवेल परिसरातील एकाही रिक्षाचालकाच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. पनवेल परिसरात तब्बल 25 हजार परवानाधारक रिक्षाचालक अजूनही या मदतीची वाट पाहात आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने राज्य शासनाने दिनांक 15 मेपासून लॉकडाऊन जाहीर केला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली होती. राज्यातील प्रत्येक परवानाधारक रिक्षाचालकाच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पनवेल तालुक्यात अशा परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या तब्बल 25 हजार इतकी आहे. या रिक्षाचालकांना मदत तर दूरच त्यांची साधी माहितीही उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांची परवड सुरूच आहे. रिक्षाचालकांच्या रिक्षा घरासमोर उभी असल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे त्याबाबत त्यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडे आपली कैफियत सांगितली व त्याची जाणीव महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व सहचिटणीस केवल महाडिक यांनी घेऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशाने तसेच संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, उपाध्यक्ष नारायण कोळी व राजू मरे, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू अशा १० महिला व १० पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यात आली. सरकारतर्फे कधी मदत मिळेल ती मिळेल मात्र राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात आलेली मदत जरी छोटी असली तरी ती वेळेत मिळाली याचा आनंद आम्हाला जास्त आहे असे रिक्षाचालक महिला – पुरुषांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी उद्योजक रमणशेठ खुटले, पनवेल तालुकाध्यक्ष अमित पंडित, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, पनवेल अध्यक्ष अनुराग वाघचौरे, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, ओमकार महाडिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.