सावत्र वडिलांनीच केला आपल्या विवाहित मुलीचा विनयभंग
पनवेल दि.17 (वार्ताहर):सावत्र वडिलांनीच आपल्या कुटूंबियांसह झोपलेल्या विवाहित मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात सदर महिलेने दिली आहे.
शहरातील तक्का दर्ग्याजवळील कातकर वाडी झोपडपट्टी येथे राहणारी एक विवाहित महिला हि आपले सावत्र वडिल, तिचे पती, मुले, आई व भावंडांसह आईच्या घरात झोपले असताना तिच्या सावत्र वडिलांनी वाईट हेतूने तिच्या अंगाशी चाळे करून तिचा विनयभंग केल्याने या महिलेने सदर तक्रारपनवेल शहर पोलिस ठाण्यातदिली आहे.