सर्वाचे आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 102 रक्तदात्यानी केले रक्तदान
कळंबोली / विकास पाटीस रक्तदान हेच जीवनदान आणि रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या देशासह राज्यात कोरोनानाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे . वाढत्या रुग्ण संख्येमुळे रक्ताचा तुटवडा आहे अशा भयानक परिस्थितीत रुग्णांना रक्त उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे त्यातून एखाद्या रुग्णांना रक्त उपलब्ध होत नसल्याने जीवाला मुकावे लागते. यावर मात करण्यासाठी सर्वाचे लाडके आवडते नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबीराला रक्तदात्यानी उस्फूर्त प्रतिसाद 102 रक्तदात्यानी रक्तदान केले.
. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त एमजीएम कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने रविंद्र भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते या शिबिराला माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शेकापचे विधानसभा संघटक काशिनाथ पाटील, नगरसेविका प्रिया भोईर, प्रज्योती म्हात्रे, शेकापचे माजी सभापती राजेश केणी, युवा नेते विजय भोईर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेनेचे के के कदम, अरविंद कडव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना भेट दिली. देशासह राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला असून कोरोनाच्या साथीत रक्ताची कमतरता आहे या रुग्णाना रक्त उपलब्ध व्हावे म्हणून नगरसेवक रविंद्र भगत यांनी कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत ‘ रक्तदान जीवदान ‘ या महत्त्वपूर्ण संकल्पनेतून तरूणाना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते याला तरुणाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी डाँक्टरांचै मोलाचे सहकार्या मिळाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तदान करता आले रक्तदान शिबिरावर रक्तदात्यानी सामाजिक अंतर व कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदानात भाग घेतला होता.
सर्व तपासण्या केल्यानंतरच रक्तदान करण्यात येत होते रक्तदात्याना रविंद्र भगत यांनी स्टिमर, सँनेटाझर व मास्कचे वाटप करण्यात आले रविद्र भगत यांच्या रक्तात समाजसेवा भिनली असल्याने ते जनतेच्या सेवेचे अनेक उपक्रम राबवत आले आहेत त्यांच्याकडून जनतेची मोठी अपेक्षा असून त्यात ते खरे उतरत आहेत.
कोरोनाला महामारीवर मात करण्यासाठी व जनतेला दिलासा मिळावा यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून युवकानी मेहनत घेतली तसेच कोरोनाला हरविण्यासाठी युवकानी पुढाकार घ्यावा असे आवाहनही रविंद्र भगत यांनी करताना भविष्यात जनतेसाठी असे उपक्रम ऱाबविण्यात येतील असे सांगितले. .