भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियान 2021 चे यशस्वी आयोजन
पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः तरुणाईच्या कलागुणांनासाठी हक्काचे व्यासपीठ असणारे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियान 2021 या ऑनलाईन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वरांनी आणि वादनाने रसिक स्त्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . गायन स्पर्धेत रिध्दी समवादे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक उमंग निगम याने पटकावला आहे. वादन स्पर्धेत सिद्धार्थ गरुड याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक ओजस जोशी याने प्राप्त केला. तरुणाईच्या कलागुणांना वाव देत नेत्रदीपक अशी नृत्य स्पर्धा पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. वैयक्तिक नृत्यमध्ये प्रथम क्रमांक मेधा तेंडूलकर तर द्वितीय क्रमांक पियूष डांगळे याने प्राप्त केला आहे. गट नृत्य स्पर्धेत के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय याने पटकावला आहे.
अभियान अंतर्गत नेत्रदीपक असे फॅशन शो चे आयोजन केले होते . भारती विद्यापीठ चा व्हर्च्यूअल फॅशन शो यूट्यूब चॅनेलवर झाला. विद्यार्थ्यांनी शैली, साहित्य आणि संकल्पनांचे एकत्रित मिलाप करीत त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या फॅशन शो मध्ये ’ ऑफ रॅक पॅक’ या गटाने प्रथम क्रमांक पटकावला. ची. अभियान हे पारितोषिक मकरंद थोराट याला मिळाले तर ची. अभियान हे पारितोषिक स्मृती भट हिला मिळाले आहे. फॅशन शो मध्ये राज सिं व्यक्तिगत मुलांमध्ये आणि व्यक्तिगत मुलींमध्ये मानसी चव्हाण हिने पारितोषिक पटकावले आहे. ’ पुन्हा शाळेत जावे’ या थिम वर आधारित अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते आणि ते यशविरीत्या पार पडले.