गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेच्या अध्यक्षपदी नवनीत पाटील.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेच्या अध्यक्षपदी नवनीत पाटील यांची तर उपाध्यक्ष पदी हिराचंद म्हात्रे आणि खजिनदार पदी संजिव माळी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे .ह्या सामाजिक मंडळाची स्थापना 11 मे 1989 साली झाली असून सलग 33 वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी 11 मे ह्या दिवशी सारडे गावच्या राधाकृष्ण मंदिरात सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात येते. पण गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे शासनाच्या आदेशाचे पालन करत धार्मिक उत्सवामुळे कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत मंडळाच्या वतीनं सत्यनारायण पूजेचे आयोजन रद्द करण्यात आले. साध्या पध्दतीनं फक्त प्रतिमेचे पूजन करून ह्या मंडळाने आपली सामाजिक परंपरा जपली असल्याची माहिती मंडळाचे माजी अध्यक्ष माधव म्हात्रे यांनी दिली आहे . दरम्यान उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडे या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नवनीत पाटील, उपाध्यक्षपदी हिराचंद म्हात्रे, खजिनदार पदी संजीव माळी यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.