किंग्ज इलेक्ट्रॉनिक्स दुकानाजवळ आढळला मृतदेह
पनवेल दि.22 (संजय कदम)- शहरातीलकिंग्ज इलेक्ट्रॉनिक्स दुकानाजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 40 वर्षे, उंची 5 फूट 2 इंच, रंग गहूवर्ण, अंगाने सडपातळ, डोक्याचे व दाढीचे केस काळे वढलेले, चेहरा उभट असून अंगात राखाडी रंगाचा फूल शर्ट व आकाशी रंगाची फूल पॅंट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पोना आनंद पाटील यांच्याशी संपर्क साधावा.