लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे चेंबूर भारतनगर येथील गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच हाक तुमची साथ आमची या ब्रीदवाक्यानुसार चेंबूर येथील भारतनगर परिसरातील गरजू नागरिकांना तांदूळ, डाळ, पीठ, मीठ, कांदे – बटाटे, चहा पावडर आदी जीवनश्याक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, पनवेल तालुकाध्यक्ष अमित पंडित, ओमकार महाडिक, लखबीर सिंग, इरफान, अभिषेक गुरव आदी उपस्थित होते.