टेकडी गार्डन परिसरात आढळला मृतदेह
पनवेल दि.23 (संजय कदम): नवीन पनवेल से.-12 येथीलटेकडी गार्डन परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलिस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक सरळ व टोकदार, उंची 5 फूट 3 इंच, केस काळे-पांढरे, दाढी बारीक काळी पांढरी असून अंगात निळ्या पांढऱ्या राखाडी रंगाचा हाफ टीशर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅंट घातली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खांदेश्वर पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक एम.जे. करचे यांच्याशी संपर्क साधावा.