मंथन फाउंडेशन व निरामय योग संशोधन व प्रसार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर आयोजित
पनवेल/वार्ताहर:एकंदरीत जगातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता मृत्युदर, मुकरमायक्रोसिसचे वाढते प्रमाण, लोकांचे मानसिक अवस्था खूप खराब झाली आहे त्यामुळे ठिकठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा, औषधांची कमतरता, बेड पुरेसे उपलब्ध न होणे, मृत्यूदर, विविध समस्या निर्माण होत आहे, यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे, या मध्ये प्रामुख्याने श्वास आणि श्वसन त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवतात, आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला ती शृंखला ब्रेक द चेन रोखायची असेल तर आपल्याला आपली मानसिक व शारीरिक, रोग प्रतिकार क्षमता वाढवणे, आणि फुप्फुसाची कार्यक्षमता वाढवणे खूप महत्वाचे आहे, तर त्याकरिता प्राणायाम आणि योग, आपली शारीरिक व मानसिक क्षमता वृध्दिंगत व्हावी, आणि सामाजिक बांधीलकी म्हणून मंथन फाउंडेशन व निरामय योग संशोधन व प्रसार केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 15 मे ते 21 मे 2021 ऑनलाईन सकाळी 6.30 ते 7.30 वाजता दरम्यान योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकी म्हणून मंथन फाउंडेशनचे आशा भट, निरामय योग प्रसार केंद्राचे मार्गदर्शक राम काकडे आणि योग केंद्र संचालक विद्या अहिरकर आणि डॉ. नीता पद्मावत आरोग्यासाठी आवश्यकता आणि काही अडचणी बाबत मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली योग डिप्लोमाचे विद्यार्थी आणि विद्याथीनी या सर्वांनी मिळून ऑनलाइन शिबिराचे आयोजन केले या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्हामध्ये मुंबई, नवी मुंबई, पनवेल, रायगड, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, औरंगाबाद, लातूर, जालना, जिल्ह्यातून एकाचवेळी ऑन लाईन 19 शिबिरे घेऊन 710 लोकांना योगाभ्यासाचा लाभ घेतला, त्यामध्ये लंग्सची क्षमता वाढवणारे विविध आसने व प्राणायाम त्यांना शिकवण्यात आली, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये किरण वारे, विजय साळुंखे, जुन्नर मधून अर्चना पवार जयसिंग मोजड, कोल्हापूर, पुणे उस्मानाबाद अशा विविध जिल्ह्यांमध्ये या ऑनलाइन शिबिराचे आयोजन केले होते, या शिबीराचा लोकांना आरोग्यासाठी अतिशय चांगला फायदा झाला असल्याचे माहिती अभ्यासकानी दिली, असून यापुढेेही अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात यावे असे मागणी आणि मत व्यक्त केले, या योगासने शिबीर मध्ये खांद्याच्या हालचाली, तिर्यक भुजंगासन, सरळ मत्स्यासन, हस्त उत्तानासन, जलनेती शुद्धिक्रिया हस्तपादासन, प्राणायाम,भ्रामरी, उज्जयी,भस्त्रिका सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या आसने, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण करून घेण्यात आली असून सर्वांनी आनंद घेऊन शिबीर संपन्न झाले असून यापुढे समाजहित, सामाजिक बांधिलकी म्हणून शिबीराचे आयोजन करणार असल्याचे किरण वारे यांनी माहिती दिली.