सा. वेध विकासाचा या वृत्तपत्राचा रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल प्रत्रिनिधी, समाजात घडणार्या प्रत्येक घटनेचा अचूक वेध घेणाऱ्या या वृत्तपत्राचा म्हणजेच साप्ताहिक वेध विकासाचा या वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
यावेळी रामशेठ ठाकूर म्हणाले की वृत्तपत्र हा समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा आहे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सुनील पाटील यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले असून सुनील हा एक सामाजिक शैक्षणिक कला या क्षेत्रात काम करणारा मुलगा आहे त्याला सामाजिक जाण आहे त्याची कष्ट करण्याची जिद्द मी जवळून पाहिले असून समाजाची नाळ त्याला जोडली गेली आहे असे म्हणत रामशेठ ठाकूर यांनी सुनील यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले हॅप्पी सिंग माजी उपसरपंच अनिल काठवले माजी सदस्य अरुण पाटील युवानेते किरण सते व पत्रकार मित्र मोठ्या उपस्थित हो