नील पार्कमध्ये लसीकरण शिबिर संपन्न अपोलो हॉस्पिटल च्या सहकार्याने 553 रहिवाशांना डोस ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच नवजात शिशुच्या माता यांच्यासाठी विशेष सोय
सोसायटीचे अध्यक्ष अतुल अनंताशेठ भोईर यांचा पुढाकार
पनवेल /प्रतिनिधी:- शासकीय लसीकरण केंद्रावर गर्दी टळावी त्याचबरोबर तेथे कोरोना विषाणूची संक्रमण होऊ नये या अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर सोसायट्यांमध्ये जाऊन लसीकरण
करण्याबाबत पनवेल मनपाने परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील नील पार्क गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने रविवारी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने 553 रहिवाशांना यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक डोस देण्यात आला.
गेल्या मार्च महिन्यापासून पनवेल परिसरात लसीकरण सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान खासगी रुग्णालयांना महापालिकेकडून लस पुरवली जात नाही. त्यांनी संबंधित कंपन्यांकडून लस घेऊन ती नागरिकांना देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून दर सुद्धा निश्चित करण्यात आले आहे. शासकीय लसीकरण केंद्रावर वाढत असलेली गर्दी, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या लसीचा तुटवडा यामुळे अनेकांना रांगा लावूनही लस मिळत नाही. येथे होत असलेल्या गरजेमुळे एक प्रकारे कोरोना विषाणूंच्या संक्रमणाला निमंत्रण दिले जाते. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईच्या धर्तीवर खाजगी रुग्णालयांची समन्वय साधून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित करण्याबाबतही पनवेल मनपाने हिरवा कंदील दिला आहे. त्याच धर्तीवर शहरातील नील पार्क सोसायटीचे अध्यक्ष अतुल अनंताशेठ भोईर यांच्या पुढाकाराने नील पार्क मित्रमंडळ यांनी अपोलो हॉस्पिटल च्या मदतीने कोविड 19 लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 553 नागरिकांचे यशस्वीरीत्या लसीकरण करण्यात आले. निल पार्क मित्रमंडळाने दर अर्ध्या तासा प्रमाणे गर्दीचे उत्तम नियोजन केल्याने नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले नाही. तसेच सोशल डिस्टनसींग चे उत्तम पालन केले गेले. ज्येष्ठ नागरिक, अपंग तसेच नवजात शिशुच्या माता यांच्यासाठी विशेष सोय तसेच सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था नील पार्क मित्र मंडळाने केली होती. लसीकरण शिबिराचे उत्तम नियोजनाचा वस्तुपाठ संबंधित सोसायटीने इतरांसमोर घालून दिला. शिबिर यशस्वी करण्यासाठी नील पार्क मित्र मंडळाचे सदस्य आनंद फडणीस
माधवी फडणीस,अमित भोईर ,अनिश मुंढे,प्रणित मुंढे,चेतन पाटील,रोहित पाटील,चिंतन कोटियन,ओंकार घरत,धनंजय ठोंबरे,मंदार पाटील,ऋषिकेश बुवा यांनी परिश्रम घेतले.