डंपरची मोटारसायकलीस धडक; एक ठार एक जखमी
पनवेल दि.06 (वार्ताहर)- पनवेल जवळील मौजे पाडेघर गावाच्या हद्दीत उरण ते पनवेल जुन्या रस्त्यावरील गव्हाण फाट्याजवळ एका डंपरने मोटारसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरील एक जण मृत पावला आहे. तर दुसरा जखमी झाला आहे. शाहिद असगर अन्सारी (वय-20, रा.-करावे गाव) व त्याच्यासोबत त्याचे वडिल असगर इलियास अन्सारी (वय-20) हे बजाज मोटारसायकलीवरून नेरूळ येथून निघून पनवेल बाजूकडे येत असताना गव्हाण फाट्याजवळ उभ्या असलेल्या डंपरवरील चालकाने त्याचा डंपर हा अचानकपणे चालू करून वळविण्यासाठी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने हयगयीने चालवून त्यांच्या मोटारसायकलीस समोरील बाजूस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात असगर अन्सारी हे गंभीर जखमी होऊन मरण पावले आहेत. तर शाहिद हा जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे.