संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल / प्रतिनिधी
अबोली महिला रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. अशामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढच होताना दिसत आहे. लॉक डाऊनमुळे असलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झालेले आहेत. यामध्ये महिला रिक्षाचालकांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अबोली महिला रिक्षा चालक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी याबाबीचा गांभीर्याने विचार करुन स्वखर्चाने नेरुळ, अंबरनाथ, बदलापूर येथील रिक्षा चालक महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करुन दिले.
त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत उपस्थित होते. ही मदत मिळाल्याबद्दल अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांचे महिला रिक्षा चालकांनी आभार मानले.
![संस्थापक संतोष भगत यांनी केले स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप](http://worldfamenews.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210609-WA0266.jpg)