मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी जातीने केली स्ट्रॉम वॉटर ड्रेन आणि ड्रेनेजच्या कामाची पाहणी.
पनवेल / प्रतिनिधी :तालुका पोलीस स्टेशन ते चिंतामणी कार्यालय चौक या रस्त्यावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन चे काम सुरू आहे,डंपर च्या रहदारीमुळे दोन ठिकाणी ड्रेनेजचे झाकण तुटल्यामुळे रहदारीस त्रास होत होता.तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता.त्यात दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते आणि त्यामुळे त्रासात आणखीनच भर पडली.कोणतीही अनुचित दुर्घटना होऊ नये यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने कॉन्ट्रॅक्टर बोलवून घेतले आणि त्वरित झाकणं बदलून घ्याला सांगितले.काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे स्वतः जातीने उपस्थित राहून शहानिशा केली.यावेळी भेट झालेल्या जेष्ठ नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील समस्या जातीने लक्ष देऊन सोडवतात त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.