रक्तदात्यांचा वटवृक्ष सामाजिक संस्थेतर्फे होणार सन्मान.
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )14 जुन जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून 22 मार्च 2020 ते 14 जुन 2021 पर्यंत कोरोना संकट काळात रक्तदान करणाऱ्या पनवेल – उरण तालुक्यातील सर्व रक्तदात्यांना वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श रक्तदाता हा ई-सन्मानपत्र देवुन गौरवण्यात येणार आहे.तसेच प्लाझ्मा दान करणाऱ्यांना कोरोना देवदुत यांचा ई- सन्मानपत्र देवुन गौरवण्यात येणार आहे.तरी सर्व रक्तदात्यांनी आणि प्लाझ्मादात्यांनी 9870955505 ह्या व्हाटस्अँप क्रमांकावर आपले पुर्ण नाव, पत्ता आणि रक्तदान किंवा प्लाझ्मादान केलेले प्रमाणपत्र पाठवावे.आपल्या व्हाटस्अँप क्रमांकावर 05 जुलै 2021 पर्यंत टप्प्या-टप्याने ई- प्रमाणपत्र पाठविले जातील.तरी वरील सर्व कोविड योद्यांनी वटवृक्ष सामाजिक संस्थेला सहकार्य करुन आपल्या ह्या महान कार्याचे सन्मान करण्याची संधी द्यावी असे आवाहन तथा नम्र विनंती किरण एकनाथ मढवी
अध्यक्ष- वटवृक्ष सामाजिक संस्था
फोन नंबर -9870955505 यांनी केले आहे.