“निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’….चिंचपाडा ग्रामस्थाची आंदोलनाची जय्यत तयारी
पनवेल,(प्रतिनिधी) — लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, यासाठी आता 24 जूनला सिडकोवर किमान 1 लाख लोकांचा धडक आंदोलन होणार आहे. त्या अनुषंगाने आंदोलनाच्या तयारीची आढावा बैठक चिंचपाडा ग्रामस्थानी रविवारी ता. 20 रोजी वरमाता आई मंदिरामध्ये घेतली. यावेळी आता “निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का” असा निर्धार चिंचपाडा ग्रामस्थानी घेतला.
यावेळी या बैठकीला समीर केणी, सचिन केणी, शशिकांत केणी, मोहन परदेशीं, प्रकाश केणी, सुभाष केणीराम पाटील, विजय केणी, संजय परदेशी, ज्ञानेश्वर केणी, लहू भोईर, यांच्यासह तरुण व पंच कमिटी सदस्य उपस्तित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि बा पाटील यांच्या नावासाठी 10 जून रोजी मानवी साखळी आंदोनल झाले असून, हे आंदोनल यशस्वी झाले आहे. त्याचबरोबर येत्या 24 जूनला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनी सिडकोला घेराव घालण्यात येणार असून, त्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. तसेच या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार आहे. त्यापार्श्वभुमीवर चिंचपाडा ग्रामस्थानी जय्यत तयारी सुरु केली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शशिकांत जनार्दन केणी, सचिन सुकीर केणी, समीर मदन केणी यांनी सांगितले कि, 10 जूनला झालेल्या भव्य आणि आदर्श अशा मानवी साखळीने संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष वेधण्याबरोबरच वाहवा मिळवली. आता चिंचपाडा ग्रामस्थाचा ‘निर्धार पक्का दिबासाहेबांचेच नाव पक्का’ हि प्रामाणिक भूमिका घेत आता रस्त्यावर उतरून सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून उजाडण्याची वाट पहात असल्याचे सांगितले.