शिवसेना खांदा वसाहत शहर शाखेच्या वतीने करण्यात आले अन्नदान
पनवेल दि.21 (वार्ताहर):शिवसेना खांदा वसाहत शहर शाखेच्या वतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून राजे छत्रपति शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला व ध्वज फडकवण्यात आला खांदा वसाहती मधील गरीब वस्ती मध्ये अन्नदान हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के ,शहरसंघटक संतोष जाधव, महिला उपमहानगर संघटिका संचिता राणे, महिला उपशहर संघटिका आस्मा खान, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपशहर प्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख संपत सुवर्णा, विभाग उपविधानसभा अधिकारी कु. सुशांत सावंत, उपशहर संघटक संजीव गमरे, उपशहर संघटक प्रकाश वानखेडे, युवती विधानसभा समन्वयक कु. वृषाली तांदळे, विभाग संघटक श्रीहरी मिसाळ, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, शाखा प्रमुख सचिन धाडवे, सुनिल औटि, संजय कांबळे, अतुल घुग, विठ्ठल चव्हाण, मंगेश पवार, उपशाखाप्रमुख दिपक जावकर, भास्कर साळवि, साबळे जेष्ठ शिवसैनिक तानाजि घारे, मंगेश क्षिरसागर, माजी शाखाप्रमुख भोजराज होटकर, रामदास गोंधळी, माजी शहरसंघटिका स्नेहा सावंत, शिवसैनिक कोरे, दत्ताराम पाटील, दिवेकर, विनीता कोलते, अर्चना क्षिरसागर, उपशहर अधिकारी कु. आदित्य मेमाने, पनवेल उपशहर अधिकारी कु. विराज साळवी, शहर चिटणीस कु. सुयश बंडगर,युवती शहर अधिकारी कु. सानिका लाडे, विभाग अधिकारी कु. आभेष ओंबळे, शाखा अधिकारी कु. सौरव महामुलकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.