आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या उरण तालुका संघटक पदी प्रांजल पाटील यांची निवड.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे येथील रहिवाशी प्रांजळ एकनाथ पाटील यांचे समाजकार्य आणि समाजाबद्दलची आस्था पाहून स्थानिक व प्रकल्पग्रास्तांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढणाऱ्या संघटनेने म्हणजेच आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी प्रांजल पाटिल यांची आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या उरण तालुका संघटक पदी निवड केली आहे.
प्रांजल पाटील हे विविध सामाजिक संस्थांसोबत संलग्न असुन अनेक सामाजिक चळवळीत कार्यरत असतात.समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते कार्यतत्पर असतात . त्यामुळेच त्यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रुपेशजी धुमाळ यांच्या आदेशाने संघटनेच्या उरण तालूका संघटकपदी करण्यात आल्याची माहिती तुषार पाटील – अध्यक्ष, उरण तालुका यांनी दिली.
प्रांजल पाटील यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.