तळोजा परिसरात सायकलची चोरी
पनवेल दि.21 (संजय कदम): पाच हजार रूपये किंमतीच्या सायकलची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.
मुकेशकुमार कन्हैय्या सिंह यांचीपाच हजार रूपये किंमतीची केशरी व काळ्या रंगाची झिपर कंपनीची सायकल तळोजा फेज-1 नवरंग रेसिडेंसी येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सायकलचे लॉक तोडून सदर सायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.