बेलपाडा परिसरात घरफोडीत दागिने लंपास
पनवेल दि.21 (संजय कदम): घऱातील मुख्य दरवाजा बंद असल्याचे पाहून त्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बेलपाडा परिसरात घडली आहे.
एकनाथ अमृतसागर (वय-45, रा.-त्रिमूर्ती सदन, बेलपाडा) यांचे घराचा मुख्य दरवाजा बंदअसल्याचे पाहून त्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरात असलेले मंगळसूत्रांसह इतर दागिने असा मिळून 38 हजार 500 रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.