मढवी दाम्पत्यांची वटवृक्ष लागवड करुन वटपौर्णिमा साजरी.
उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )
वटवृक्ष हा भारतीय संस्कृतिचा एक भाग आहे. हिंदु पंचागांत जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणुन साजरा होत असतो. आणि ह्या दिनाचे औचित्यसाधुन उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांच्या पत्नी सौ. हेमल मढवी यांनी गतवर्षा प्रमाणे यंदाही उलवे नोड परिसरात आपल्या पतीसोबत वटवृक्ष लागवड करुन वटपौर्णिमा सण साजरा केला.
ह्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुषीकरिता वडाच्या झाडाची मनोभावी पुजा करतात. नव्याने विकसित होत असलेल्या उलवे शहरातील लोकसंख्येच्या अनुशंघाने वडाच्या झाडांची संख्या खुपच कमी असल्याने किरण मढवी यांनी गेल्या काही महिन्यापुर्वी उलवेतील प्रत्येक सेक्टर मधे वटवृक्ष लागवडीसाठी आवश्यक जागा संस्थेला उपलब्ध करण्यासंदर्भात लेखी मागणी सिडकोकडे केली होती, मात्र सिडकोकडुन त्याबाबत कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे किरण मढवी यांनी नाराजी व्यक्त केली. वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वडाच्या फांद्या तोडण्याची वेळ भविष्यात उलव्यातील वटसावित्रींवर येवु नये यासाठी संस्था कार्यरत आहे. राष्ट्रीय प्रतिक असलेल्या वडाच्या झांडाचे संवर्धन होणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिमहत्वाचे असल्याने सर्वांनी दरवर्षी एक तरी वटवृक्ष लागवड करावे यासाठी संस्थेच्या वड बँक नर्सरीत वृक्षप्रेमींना मोफत रोपे उपलब्ध करीत आहेत. नैसर्गिक, धार्मिक, आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातुन अतिशय महत्वाचा मानला गेलेला हा वटवृक्ष आजच्या दिनी लागवड करुन मढवी दाम्पत्यानी जे समाजापुढे नवा आदर्श ऊभा केला आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे.