महेश साळुखे यांजकडून शैक्षणीक साहित्याचे वाटप
पनवेल दि.२८ (वार्ताहर)- स्वाभिमानी युथ रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई मनोज संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल येथील लोकमान्य नगर येथील नववीत शिकणाऱ्या निशा अनंत गोरे या विद्यार्थीनीस शैक्षणीक साहीत्याचे वाटप केले. निशा हीचे आई व वडील या दोघांचे कोरोनाच्या काळात निधन झाले. तिचे पुढचे शिक्षण थांबू नये या करीता महेश साळुंखे यांनी तिला शैक्षणीक साहित्याची मदत केली.
स्वाभीमानी युथ रिपब्लीकन पार्टीच्या माध्यमातून महेश साळुंखे दरवर्षी मोफत शैक्षणीक साहित्याचे वाटप करीत असतात. गुरुवार दिनांक १ जुलै रोजी शिक्षक विनोद गावंड यांना श्रद्धांजली म्हणून रायगड जिल्हा परीषदेची वडघर येथील मराठी शाळेमध्ये विध्यार्थ्याना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम गरीब विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शाळा समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत चिंतामण कांबळे, उपाध्यक्षा सोनाली महेश साळुंखे, शाळा समीती सदस्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थीत राहणार आहेत.
कोरोनाच्या काळात अनेक पालक बेरोजगार झालेले आहेत. पालकांच्या बेरोजगारीमुळे अनेक, पाल्याचे शिक्षण थांबलेले आहे. आपली सामाजीक जबाबदारी म्हणून महेश साळुंखे यांनी या बेरोजगार पालकांच्या मुलांना थोड़ी मदत म्हणून मोफत वहया वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.