बबन कांबळे यांची काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड.
उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )उरण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा आर्क फॉउंडेशनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी कोरोना काळात केलेल्या मानवतावादी कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस सेवा फॉउंडेशनचे राष्ट्रीय इन्चार्ज अभिनव सिंग यांनी त्यांना दिले आहे.
बबन कांबळे हे आर्क फॉउंडेशनचे अध्यक्ष आहेत. या फॉउंडेशनच्या माध्यमातून कोविड काळात गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप, ऍम्ब्युलन्स सेवा आदी उपक्रम आर्क फॉउंडेशनच्या माध्यमातून बबन कांबळे यांनी राबविले. यातूनच त्याचा संपर्क काँग्रेसच्या ‘काँग्रेस सेवा फॉउंडेशन’ या सेवाभावी संस्थेशी आला. अनेक कामे करताना काँग्रेस सेवा फॉउंडेशनची सुद्धा मदत बबन कांबळे यांना झाली. त्यातून बबन कांबळे यांचे संघटन कौशल्य, दांडगा जनसंपर्क व मानवतावादी कार्याचे कौतुक करत काँग्रेसने काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदी त्यांची निवड केली आहे.सध्या बबन कांबळे हे रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे / कमिटीचे जिल्हा चिटणीस तसेच उरण शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत.2011-2016 दरम्यान उरण नगर परिषदेत नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. नगर परिषदेत विरोधी पक्षाची भूमिकाही सक्षमपणे त्यांनी पार पाडले. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.