आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय कळंबोली येथे फूलनदेवी यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ अभिवादनाचा कार्यक्रम सपन्न
पनवेल प्रतिनिधी:आज 25 जुलै दुपारी 3 वाजता आजाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय कळंबोली येथे फूलनदेवी यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ अभिवादनाचा कार्यक्रम आझाद समाज पार्टी च्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ.नेहाताई शिंदे ,व महाराष्ट्र कोषाध्यक्षा सौ राजश्री अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली , पनवेल तालुका अध्यक्ष सौ.रूपालिताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला दुपारी ३ वाजता बहन फूलनदेवी यांना अभिवादन करण्यासाठी आजाद समाज पार्टी, पनवेल तालूक्यातील कळंबोली कामोठे व उलवे येथील सर्व महिला उपस्थित होत्या. अभिवादन करताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा
नेहाताई शिंदे यांनी महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील सर्व महिलांना आवाहन केलं की फुलनदेवी या असीम त्यागाची, बेधडक वृत्तीची, अन्याविरूद़्ध पेटून उठणारी आणि न्यायाची वाट न पहाता स्वत:वर अत्याचार केलेल्या २२ अत्याचारींना यमसदनाला पाठवणारे महिलांची प्रेरणास्थान आहे. त्यांची जयंती व स्मृतिदिन हा प्रत्येक महिलेने आपला प्रेरणा दिन समजून त्या दिवसाचं महत्व जपणं गरजेचं आहे..
कोषाध्यक्षा सौ.राजश्री अहिरे यांनी सांगीतले की सर्व स्त्रीयांनी फूलनदेवी सारखं निडर होऊन जगल पाहिजे…
पनवेल तालूका अध्यक्षा सौ. रूपालीताई शिंदे या म्हणाल्या की अन्याय सहन करणे सर्वात मोठा गुन्हा आहे ,महिलांना न्याय स्वतःच मिळवून घ्यायची वेळ येऊ देऊ नका जर अशी वेळ आली तर आम्ही सर्व एक जुटीने न्याय मिळवू,आज चा दिवस आम्ही ऐतिहासिक दिवस असा दर वर्षी अभिवादन करू..
बहन फुलनदेवी यांना अभिवादन करण्यासाठी पत्रकार विनिता बर्फे मॅडम, विद्याताई जाधव, नेरूळ शहर प्रमुख प्रमिला खंडागळे, कामोठे शहर प्रमुख किरण अडागळे, सोशल वर्कर मलिका बेहत्तर, वुमन राइट्स नॅशनल प्रेसिडेंट निशा दुरापे, ऑल इंडिया जनसेवा संघटना उरण प्रेसिडेंट वैशाली पाटील व महिला कार्यकर्ता आदी उपस्थित होत्या.