तोगरे दांपत्यांचा साडी व खाऊ वाटप करून आदिवासी दिन साजरा.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
जग विख्यात साहित्य रत्न, लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती महाराष्ट्र,कर्नाटक, मध्य प्रदेश,आणि गुजरात मधील अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी ऑगस्ट महिण्यात मोठ्या थाटात साजरी करतात.रक्तदान शिबीर , मोफत आरोग्य शिबिर,अण्णाभाऊ चे लिखित लावन्या- पोवाडे व गीत-संगिताचे आयोजन तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दान तथा या कोरोना महामारी मुळे हतबल झालेल्याना अन्न-धान्य,सॅनिटायझर, मास्कचे मोफत वाटप करून समाज ऋण जपतात. याच जयंतीचे औचित्य साधून जागतिक आदिवासी दिनांच्या पुर्व संध्येला उरणचे प्रसिद्ध समाज सेवक दांपत्य संग्राम तोगरे व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळ अध्यक्ष सुमनताई तोगरे यांनी उरण तालुक्यातील चिरनेर येथील आक्कादेवी पाड्यातील ८० वनवासी महिलांना नव्या साड्या व मुलांना खाऊचे वाटप करून “जागतिक आदिवासी दिन” साजरा केला. या कार्यात भरत जाधव, मिनाबेन जाधव,नरेशभाई तसेच त्यांच्या मंडळाचे मोलाचे सहकार्य मिळाले.सदर प्रसंगी चिरनेर महिला अध्यक्षा मिराबाई पाटील, मुक्ता साळवे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा ऋचिता मलबारी,सुरज तिडके,संतोष म्हसूरकर,रमेश पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे यांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.