ग्रामपंचायत भेंडखळ तर्फे पूरग्रस्तांना मदत
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ग्रामपंचायत भेंडखळ यांच्याकडून महाड येथील संवाद गावात जाऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आले. यावेळी भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री चव्हाण ,उपसरपंच लक्ष्मण शेठ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्या संध्या दिपक ठाकुर, सोनाली ठाकूर, नीलम भोईर,स्वाती घरत, नीता ठाकूर, योगिता ठाकूर, सुचित्रा ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर, किशोर ठाकुर, रतन ठाकूर,ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, ग्रामपंचायत भेंडखळ कर्मचारी निशा वशिनिकर, दिपाली मते, रावले, मंगेश, कौस्तुभ ठाकुर, वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत भेंडखळ ग्रामपंचायतीच्या वतीने पूरग्रस्तांना चादर, चटई,टाँवेल,साडी,पाच लीटर पाण्याचा कँन, महिलांना लागणारे साहित्य याचे वाटप करण्यात आले.