स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे मैत्रकुल जीवन विकास केंद्र (भिवंडी) येथे दैनंदिन जीवन उपयोगी वस्तू तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप.
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )
मैत्रकुल जीवन विकास केंद्र ही संस्था खेड्यापाड्यातील मुलांसाठी आणि ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिकता येत नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा एक किरण आहे. ज्यांच्याकडे स्वतःच घर नाही त्यांच्यासाठी हि संस्था हक्काचं घर आहे. या संस्थेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील 35 मुले निवासित आहेत आणि याच मुलांसोबत अमृतमोहत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान नियोजिले आणि त्या मुलांसोबत दिवस आनंदात घालवता यावा असे आयोजन देखील केले.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत, ध्वजरोहन, राष्ट्रगीत गायन, ध्वजगीत गायन, अध्यक्षीय भाषण, मान्यवरांची मनोगते आणि निरोप समारंभ अशा प्रकारे झाली.
सोबतच या संस्थेला दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे वेगवेगळ्या प्रकारचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभाग तर्फे मोठी पट्टी, सेलो टेप, फुल स्केप पेज, व्हाईट् बोर्ड मार्कर, स्केच पेन, वॉटर कलर, कटनिप मार्कर, कैच्या, चित्रकला वही, A4 वही अशा स्वरूपातील व बऱ्याच दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून जमा केलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
सदर संकल्पित उपक्रम उरण तालुक्यातून पूर्णत्वास नेण्यासाठी चेतन गावंड आणि सुमित थले यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच वस्तू वाटप करतेवेळी भूपेंद्र पाटिल, रवींद्र भोईर, चंद्रशेखर भोमकर, राज म्हात्रे, सतीश जुनघरे, बलराज शेट्टी, अमेय अंबेकर आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कावळे व सहकारी मित्र उपस्थित होते.
सदरच्या अनमोल सहकार्याबद्दल मैत्रकुल जीवन विकास केंद्राचे अध्यक्ष आशिष गायकवाड यांनी दुर्गमवाळा प्रतिष्ठानचे आभार मानले व सर्व उपस्थित मान्यवर, सहकारी मित्र तसेच देणीगीदारांचे चेतन गावंड यांनी आभार मानले.