खारघर येथील अनेक युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
पनवेल/प्रतिनिधी:आज शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री सन्मानीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणाली वर प्रेरित होऊन. शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड पनवेल मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व खारघर शहर प्रमुख श्री. शंकरशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने खारघर येथील सेक्टर-२० श्रमिक सोसायटीतील अतुल काळे, अमोल काळे, प्रथमेश कनमुटकर, सुशांत पवार, भावेश धावट, रमेश धनावडे, गणेश एकड, विजय जाधव, महेश चवळके, नरेश हरिदास, विशाल कदम, सुरज दळवी, राजेश एकाड, किशोर एकाड, वैभव कौर, विशाल कौर, अक्षय कदम, यांच्या सह अनेक युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. जिल्हाप्रमुख मा. शिरीष घरत साहेब यांनी सर्व युवकांच्या हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना पनवेल महानगर प्रमुख श्री. रामदासजी शेवाळे, उपशहर प्रमुख मंगेश रानावडे, विभाग प्रमुख इम्तियाज शेख, संजय सावंत, मनेश पाटील, युवासेनेचे प्रेम ठाकूर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!