साडे चार लाख रूपयांच्या पाईपांची चोरी
पनवेल दि.06 (संजय कदम)- तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील साडे चाल लाख रूपये किंमतीच्या पाईपांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
सचिन चव्हाण (वय-32) यांच्या कंपनीचे हॉरिझोंटल डायरेक्शनल ड्रिलींग मशिनवर लोखंडी पट्टीला कुलूप लावून पॅक केलेले जवळपास 50 लोखंडी पाईप ज्याची किंमत 4, 48, 990 रू. इतकी आहे. नौमानी मजिदजवळ पनवेल-मुंब्रा रोडलगत ठेवले असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सदर पाईप चोरल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.