श्री ज्ञानेश्वर माऊली विकास समिती व राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने देश सेवा निवृत्त सुभेदार श्री.भरत आत्माराम सावंत यांचा सन्मान
पनवेल/प्रतिनिधी: देश सेवे साठी जीवाची बाजी लावत अनेक लढ्यात सहभाग चीन भारत लडाका सीमेवर आपले देश रक्षणाचे कर्तव्य बजावनारे सेवा निवृत्त शुभेदार श्रीभरत आत्माराम सावंत याचे .श्री ज्ञानेश्वर माऊली विकास समिती सहकारी तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी सैनिक म्हणून केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.अश्या
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या…यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री. केवळ महाडिक, राजे प्रतिष्ठान कामगार सेना नवीन पनवेल अध्यक्ष श्री. संतोष आमले उपस्थित होते.सुभेदार भरत सावंत आणि सीमेवरील काही प्रसंग सांगितले. राजे प्रतिष्ठान कामगार सेना मार्फक्त श्री. केवळ महाडिक आणि संतोष आमले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री ज्ञानेश्वर माऊली विकास समिती मार्फत श्री. प्रदीप धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन कु. वैभव तळेकर यांनी केले.यावेळी दादासाहेब घालमे, लक्षण अनभुले, विकास चितळे, कविता बनसोडे, मांजरेकर मॅडम, सतीश रणखांबे, सीताराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.