अज्ञात वाहनाच्या धडकेने कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यु
पनवेल, दि.20 (वार्ताहर)- अज्ञात वाहनचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून एका कुत्र्याच्या पिल्लास निर्दयीपणे ठोकर मारून त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
तालुक्यातील इंडियाबूल्स बिल्डींग नं-20 जवळ सावळा, आपटा रोड, कोन गाव याठिकाणी अनमोल भारध्वाज या रोज जेवण घालत असलेल्या भटक्या कुत्र्यांपैकी 4 महिन्यांच्या फिक्कट चॉकलेटी रंगाच्या एका कुत्र्याच्या पिल्लास कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून एका कुत्र्याच्या पिल्लास निर्दयीपणे ठोकर मारून त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याची तक्रार त्याने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.